
0
6
4
5
1
8
इंद्रधनू
काळ्याकुट्ट नभातून
बरसू दे धारा
सो सो करीत वाहू दे
ओलांचिंब वारा
ये रे ये रे पावसा
तू कसा रे लहरी
सप्तरंगी इंद्रधनू
कमान सोनेरी
इंद्रधनूचे रंग
बोलके असतात छान
शोभून दिसते नभी
सप्तरंगाची कमान
लपाछपीचा खेळ
तो खेळतो माझ्यासंग
मी ही भरून घेतो
ओंजळीत सप्तरंग
ता, ना, पी, ही, नी, पा जा…
नभात कोण काढतो चित्र
पावसाच्या सरी झेलत
आम्ही आनंदित होतो मित्र.
इंदू मुडे, ब्रम्हपुरी
जिल्हा चंद्रपूर
0
6
4
5
1
8



