Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना सापडले मिठू – मिठू पोपट

प्रतिनिधी: वसुधा वैभव नाईक, पुणे

0 4 8 2 9 0

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना सापडले मिठू – मिठू पोपट

प्रतिनिधी: वसुधा वैभव नाईक, पुणे

पुणे : 16 जुलै 2025 वारजे, पुणे येथील सेवाव्रती फाउंडेशन संस्थेत मधुकर्णिका फाउंडेशन तर्फे नुकताच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत, विचारवंत, साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा खास बालांसाठी ‘सबकुछ मधुसूदन ‘ हा विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अध्यक्षस्थानी मधुकर्णिका फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा आणि कवयित्री मधुकर्णिका सारिका सासवडे होत्या. प्रदीप देवकुळे यांनी संयोजन केले. मधुकर्णिका सासवडे यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या विविध कलागुणांची माहिती बालांना दिली. बालिका सोनाली कांबळे हीने आभार मानले.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी हसण्याचे प्रकार, रडण्याचे प्रकार , बोलकी बाहुली, बोलके प्राणी पक्षी , विनोदी पाढे, अक्षराच्या गमतीजमती, शिट्टीवर बालगीते ..असा बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रम करुन बालांची मने जिंकली. गोड बोलणा-या बालांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी मिठुमिठु पोपट पुरस्कारही दिले.मधुकर्णिका सासवडे यांनी बालांना खाऊही दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे