Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिर्सी उपकेंद्र क्रीडा स्पर्धेचे आयोजन

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या आयोजनाने विद्यार्थी आनंदात

0 4 8 2 9 4

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिर्सी उपकेंद्र क्रीडा स्पर्धेचे आयोजन

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या आयोजनाने विद्यार्थी आनंदात

प्रतिनिधी, अखिल रोडे

उमरेड/सिर्सी: जिल्हा परीषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे दिनांक १७/१२/२४ रोज मंगळवार ला जिल्हा परीषद शाळेच्या भव्य प्रांगणात उपकेंद्र क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. वंदनाताई बुटे सरपंचा सिर्सी ग्रा.पं सिर्सी तसेच प्रमुख अतिथी श्री. मिलिंदभाऊ सुटे समाज कल्याण सभापती जिल्हा परीषद नागपूर.यांची प्रमुख उपस्थितीत होते.

विद्यार्थ्याने लेझिम करत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या स्पर्धेत सिर्सी केंद्रातील दहा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत. सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्य दाखवले. या सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.प. प्राथमिक शाळा हिवरा येथिल मुख्याध्यापक कावडकर सर तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिर्सी येथील केंद्र प्रमुख राणे सर यांनी केले.

कनिष्ठ गट कब्बडी मुले, कनिष्ठ गट नृत्य, 24 किलो कुस्ती, 28 किलो कुस्ती, 100 मीटर रंनीग , सावित्रीबाई लेक एकल नृत्य, वेशभूषा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा , बुध्दीबळ स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी घेण्यात आलेल्या परीश्रम घेणाऱ्या विद्यार्थी व कर्मचारी वर्गाचे आभार जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सिर्सी येथिल उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.चंदुजी दांदडे यांनी व्यक्त केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद भाऊ वानखेडे , सौ. शेगोकर मॅडम , सौ. सायरे मॅडम, सौ. नारनवरे मॅडम, श्री. सायरे सर, कु. बाकडे मॅडम, कु. आत्राम कु. रामटेके मॅडम यांनी सहकार्य केले. उपकेंद्र क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून शिरशी ग्रामपंचायत च्या सन्माननीय सरपंच माननीय वंदनाताई बुटे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी उद्घाटक म्हणून समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर माननीय मिलिंद सूटे हे होते कार्यक्रमाचे सुरुवात लेझीम पथकांनी त्यांचे स्वागत करण्यात आलं.

उपकेंद्र क्रीडा स्पर्धा मध्ये शीर्षी केंद्रातील दहा शाळेनी भाग घेतला सर्वच मुला मुलीनी क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य या ठिकाणी दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय कावडकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा तसेच प्रास्ताविक माननीय राणे सर केंद्रप्रमुख सिर्सी यांनी केले आभार प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक चंदूजी दांदडे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोदजी वानखेडे व शाळा समितीचे सन्माननीय सदस्य हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे