0
4
8
2
9
0
सल काळजाची
सल काळजाची माझ्या
कधी कुणा कळेल
वेदनेचे काहुर माझे
कोणत्या दिशेला वळेल
सांगाती मीच माझा
नसे सावराया कुणी
ओल्या जखमांचाही
झालो एकटा धनी
किती पुकारले आजवर
नाही ऐकणारे कोणी
सल मनातील माझ्या
डोळा आसवांचे पाणी
नाही कुणाचे कोणी
हीच जगाची रीत
कोण देणार आधार
कसे कळणार हित
सल घेऊन सोबतीला
चालली ही जीवन नौका
टुरावले सारेच आता
किती मारल्या हाका
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे
=========
0
4
8
2
9
0



