Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

अ.‌ता.शि.‌प्र.‌.मंडळाच्या भाल शाळेची गरूड भरारी; कु.‌हर्षाली आटपाडकर शिष्यवृत्तीधारक

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 9 0 3 4

अ.‌ता.शि.‌प्र.‌.मंडळाच्या भाल शाळेची गरूड भरारी; कु.‌हर्षाली आटपाडकर शिष्यवृत्तीधारक

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग, (दि १६): तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भाल प्राथमिक शाळेने शासकीय शिष्यवृत्ती. परीक्षेत गरुड भरारी घेतली आहे. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा हीच शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची मोजपट्टी आहे . 2025=26च्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता चौथी मधील. कु.‌हर्षाली आटपाडकर ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक बनली असून या विद्यार्थिनीचा रायगड जिल्ह्यात नववा क्रमांक आला आहे.‌

या शाळेने शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक बनण्याची परम्परा कायम ठेवली आहे.‌ गतवर्षी ( २०२४ -२५ मध्ये) या शाळेतील कुमार रुद्र राजाराम पवार ( इयत्ता पाचवी) शिष्यवृत्तीधारक बनला असून त्याचा रायगड जिल्ह्यात सातवा क्रमांक आला आहे.‌ सदर विद्यार्थ्यांची केन्द्र शासनाच्या माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील नवोदय विद्यालय या निवासी शाळेत निवड झाली आहे.‌ या प्रज्ञावंत विद्यार्थ्यास इ.‌दहावीपर्यन्त शासनाकडून शिष्यवृत्ती मिळेल शिवाय भोजन व निवास व्यवस्थाही इयत्ता दहावी पर्यंत मोफत आहे.‌

कुमारी हर्षाली आटपाडकर या विद्यार्थिनीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत अ.ता.‌शि.‌प्र.‌मण्डळाचे अध्यक्ष बळवंत वालेकर , सेक्रेटरी द.‌ल.‌माळवी आणि संस्थेच्या भाल शाळेचे मुख्याध्यापक गुलाब काळे यांनी अभिनंदन केले आहे.‌

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे