
0
4
8
2
8
4
प्रजेची सत्ता
हुकुमशाहीच्या साखळदंडात
जखडली होती लोकशाही
होरपळत होती सारी जनता
मुस्कटदाबी वरुन ठोकशाही
झाली पहाट जरी स्वातंत्र्याची
दिस अजूनही नव्हता उगवला
प्रजेची सत्ता अवतरण्यासाठी
बाबासाहेबांनी निशचय केला
संविधानाच्या निर्मितीचा
भीमरायांचा अमुल्य ठेवा
भोगतो आज खरे स्वातंत्र्य
भारतीयांचा जगाला हेवा
अमृतमहोत्सव प्रजासत्ताक
घराणेशाहीने पोखरला जातोय
वारसदाराच्या ओझ्याखाली
सर्वसामान्य भरडला जातोय
प्रजेची सत्ता घालतेय पिंगा
बापानंतर मुलगा,नातू नि पंतू
रुतला लोकशाहीच्या पोटात
वंशावळीतील घराणेशाहीचा जंतू
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
8
4



