महात्मा फुले शिक्षण संस्थेत, ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले’ जयंती उत्सव साजरा
नागपूर शहर प्रतिनिधी

महात्मा फुले शिक्षण संस्थेत, ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले’ जयंती उत्सव साजरा
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर: (दि १२) शहरातील महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग नागपूर येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यांना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संतशिरोमणी सावता महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करून क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांची मशाल ज्योत उपस्थित मान्यवरांकडून प्रज्वलीत करण्यात आली व भोजनदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, माजी आमदार अशोकराव मानकर, गिरिश पांडव, गुड्डु तिवारी, शुभाष घाटे, धर्मेंद्र नंदरधने, कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, सहचिटणीस रमेश राऊत, कोषाध्यक्ष प्रा. मुकेश घोळसे, समिती संयोजक राजेंद पाटील, सहसंयोजक प्रा.डॉ. अभिजित पोतले, मोहीत श्रीखंडे, देवेंद्र काटे, प्रा. पंकज कुरळकर संचालिका शोभा लेकुरवाळे, डॉ. अलका झाडे, माधुरी गणोरकर, सुलेखा पवार, देवराव प्रधान व मोठया संख्येने फुले, आंबेडकर अनुयायी, समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.



