Breaking
खानदेशदादरा नगर हवेलीनागपूरनाशिकपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“दीक्षाभूमी ही केवळ स्मृती नाही, ती परिवर्तनाची प्रेरणा आहे”; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

0 6 2 7 9 7

“दीक्षाभूमी ही केवळ स्मृती नाही, ती परिवर्तनाची प्रेरणा आहे”; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

ही भूमी केवळ भूगोलाचा भाग नाही, तर इतिहासाच्या हृदयात धगधगणाऱ्या क्रांतीची ज्वाला आहे. हे स्थळ केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर मानवी अस्मितेच्या पुन:जागरणाचे शाश्वत प्रतीक आहे. नागपूरची पावन दीक्षाभूमी ही अशाच एका युगप्रवर्तक वैचारिक क्रांतीचे तेजोमय अधिष्ठान आहे!

आजपासून ७० वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी या भूमीवर बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली आणि भारतीय सामाजिक इतिहासाच्या क्षितिजावर समतेच्या नवसूर्योदयाचा मंगलारंभ झाला. हा केवळ धर्मांतराचा ऐतिहासिक क्षण नव्हता, तर शतकानुशतकांच्या विषमतेच्या अंधकाराला विवेकाच्या प्रकाशाने छेद देणारा मानवी स्वाभिमानाचा महाघोष होता. दीक्षाभूमी म्हणजे विचारांचे तीर्थक्षेत्र, स्वाभिमानाचे विद्यापीठ आणि मानवमुक्तीच्या इतिहासातील एक अजरामर सुवर्णपर्व!

भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा आणि समतेच्या तत्त्वज्ञानाला बाबासाहेबांच्या परिवर्तनशील विचारांची जोड लाभली आणि वंचितांच्या जीवनात आत्मभानाचा नवा दीप प्रज्वलित झाला. या भूमीने जगाला अधोरेखित केले की माणसाच्या प्रतिष्ठेचा खरा आधार त्याचा जन्म नसून त्याचे कर्तृत्व, त्याची विवेकनिष्ठा आणि त्याची माणुसकी हा आहे.

दीक्षाभूमीसमोर नतमस्तक होणे म्हणजे केवळ इतिहासाच्या स्मृतींना अभिवादन करणे नव्हे तर समतेच्या मूल्यांशी जीवननिष्ठेची बांधिलकी स्वीकारणे होय. बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष केवळ शब्दांत घुमविण्यापेक्षा तो आपल्या आचरणातून साकार करणे, हीच या पवित्र भूमीच्या चरणी अर्पण केलेली सर्वोच्च कृतज्ञांजली!

दीक्षाभूमी ही केवळ स्मृती नाही, ती परिवर्तनाची प्रेरणा आहे. केवळ श्रद्धा नाही, ती विवेकाची चेतना आहे,केवळ ऐतिहासिक वारसा नाही तर ती समतामूलक भविष्याची आश्वासक पहाट आहे! या पावन भूमीतील प्रत्येक कण जणू मानवतेचा एकच संदेश देतो. ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवा, स्वाभिमानाची ज्योत अखंड तेवत ठेवा आणि समतेच्या मूल्यांनी समाजजीवन समृद्ध करा. कारण दीक्षाभूमीचे खरे पावित्र्य तिच्या वास्तूत नसून तिने जागविलेल्या विचारांत आहे, तिचे चिरंतन महात्म्य तिच्या इतिहासात नसून त्या इतिहासातून प्रेरणा घेऊन घडविल्या जाणाऱ्या उद्याच्या समतामूलक समाजात आहे!

अशा या पावन दीक्षाभूमीला विनम्र अभिवादन करण्याचे आजचे निमित्त होते, ‘बुधवारीय काव्यरत्न स्पर्धा’ मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी आज या स्पर्धेच्या निमित्ताने पावन दीक्षाभूमी हा विषय दिला. सर्वांनीच या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन करत दीक्षाभूमीचे महत्व अधोरेखित केले. पावन दीक्षाभूमीचा संदेश स्पष्ट आहे.

अज्ञानातून ज्ञानाकडे चला, विषमतेतून समतेकडे चला, द्वेषातून बंधुतेकडे चला आणि अंधानुकरणातून विवेकाकडे चला! हा संदेश आत्मसात करूया. सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. लिहीत रहा….!! साहित्याची कदर करण्यासाठी मराठीचे शिलेदार समूह भक्कम आहे या शाश्वत ग्वाहीसह या ठिकाणी थांबते.. मनस्वी धन्यवाद…!!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 7 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे