आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला: तुरीच्या दाण्याचा पराठा
मीनाक्षी काटकर दारव्हा, जि.यवतमाळ
0
4
8
2
9
3
माझी पाककला: तुरीच्या दाण्याचा पराठा
साहित्य : दोन मोठ्या वाट्या कणिक,दोन वाट्या तुरीचे ओले दाणे,सात ते आठ हिरव्या मिरच्या, वाटीभर चिरलेली कोथिंबीर,चिरलेला कांदा एक वाटी, लसूण पेस्ट एक चमचा, तेल एक वाटी, एक चमचा,धने जिरेपूड हळद,मीठ,जिरे,लाल तिखट एक चमचा,मोहरी इत्यादी.
कृती: कणिक मळून घ्या. तुरीचे दाणे व हिरव्या मिरच्या भाजून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.कढईत तेल घालून जिरे ,मोहरी,कांदा, लसूण,हळद, तिखट, धने जिरेपूड घालून परतावे नंतर त्यात दाण्याचे वाटण घालून नीट परतावे. झाकण ठेवून मंद आचेवर होऊ द्या.थंड झाले की पुरणासारखे कणकेच्या गोळ्यात भरून पराठा लाटून घ्या.तेल लावून खरपूस भाजून घ्या.लोणचे किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा तुरीच्या दाण्याचा खरपूस चटपटा पराठा.
मीनाक्षी काटकर
दारव्हा, जि.यवतमाळ
=========
0
4
8
2
9
3



