
0
4
8
2
9
0
जाता जाता दिला इशारा
सहवासाला कंटाळलो होतो
तुझं माझं करत होतो…..
कुणाचा इगो कुणाचा राग
रोजच सांभाळत होतो….
किती झालं कितीही असलं
तरी रोज तोंडदेखलेपण होतं
मनात अढी ठेवून का होईना…
रोज काम करणंच होतं
झाली एक दिवस कामाची बदली
गंमत ती जबाबदारीच्या अभ्यासाची
मी का तू, तू का मी करता
लोकसभा निवडणुक केंद्राची
क्षणात ओळख पटली
जणू आपण सारे घरातले
कार्य पार पाडू ही ग्वाही
बोलू लागले की मनातले..
एखादं होतं बडबडी
एखादं होतं गडबडी…
एक संयमी तर दुसरं विचारी
अन् तिसरं मजेशीर खडबडी
जसं की मांडव घाई…
एकाचं होता दुसरं समजून जाई
दक्षता आणि सावधगिरी…
या गुणांची गंमत होई
झाली कर्तव्याची पूर्ती
जाता जाता दिला इशारा
पुन्हा विधान सभेला भेटू
टिमवर्कचा खेळ न्यारा
सिंधू बनसोडे
इंदापूर.पुणे
============
0
4
8
2
9
0



