अहमदनगरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
वाटतं कधी कधी; सुजित वाघमारे
0
4
8
2
9
4
वाटतं कधी कधी
वाटतं कधी कधी त्या एकट्या
मनाला कुणाची तरी साथ हवी
त्या रडणाऱ्या डोळ्यांना कोणीतरी
आपल्या हातांनी पुसावं
त्या पहाटेच्या स्वप्नांना
आयुष्याची साथ द्यावी
त्या हरवलेल्या आठवणींना
एकदा तरी हाक मारावी
त्या गुंतलेल्या आयुष्याला
कधीतरी या गुंत्यातून सोडवावं
त्या स्वप्नातल्या गोडवलेल्या घरांना
एकदा तरी प्रेमाने बांधाव
त्या घरातल्या अबोल भिंतीशी
काहीतरी एकटेपणात बोलावं
मलाही वाटतं ह्या एकटेपणात
कधी कधी एकटेच कोपऱ्यात बसून रडावं……
सुजित वाघमारे
ता.जळकोट जि.लातूर
========
0
4
8
2
9
4



