0
4
8
2
9
0
एक होती परी
एक होती परी
बिना पंखाची
फाटक्या लुगड्याची
न अबोल डोळ्यांची
मला जे हवं
ती मला आणून देई
नाही या शब्दाचं
भंडारच नाही तिच्या ठाई
माय बा चे अपघात झाले
माझी आजीच आता आई झाली
मिळेल त्या कामाला जाई
पोटभर मला जेवण देई
तिच्या रूपात मला
परीची भेट होई
माझ्या प्रत्येक कार्यात
यश प्राप्त होई
ज्योती कार्लेवार चंद्रपूर
0
4
8
2
9
0



