
0
4
8
2
9
3
एक भेट चांदोबाशी
दही भाताचा घास मला
आई प्रेमाने भरवू लागली
चांदोबाचे गीत गाऊन आपल्या
कुशीत मला निजवू लागली
गाढ झोपी जाताच माझी
एक भेट चांदोबाशी घडली
गोलगोल गुळगुळीत चंद्रमा
बघून मला मौजच वाटली
लपाछपीचा खेळ चांदोबाचा
मी जवळून बघितले गगनात
त्याला धरायला मागे मागे मी
धावू लागलो खुपच आनंदात
चांदोबाच्या पाठीवर बसून
आकाशगंगा फिरू लागलो
चांदण्यांच्या गर्दीत जाता
मी पुरता सुखावून गेलो
चंदूमामा तुझ्या चंदेरी दुनियेत
तुझ्यासोबत मला राहू देशील का
ढगांमागे लपू आपण खूप खूप खेळू
माझा बालसंवगडी होशील का
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल जि. चंद्रपूर
0
4
8
2
9
3



