Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

ॲड. दत्ता पाटील लॉ काॅलेजचे युवा महोत्सवात यश

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

ॲड. दत्ता पाटील लॉ काॅलेजचे युवा महोत्सवात यश

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: शहरात दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई विद्यापीठ आयोजित ५७ व्या युवा महोत्सवातील रायगड दक्षिण विभाग जिल्हास्तरिय फेरीचे डॅा. श्री.नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,कोलाड येथे आयोजन करण्यात आले होते.

या युवा महोत्सवात रायगड दक्षिण विभागातील २५ महाविद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, अभिनय ,वक्तृत्व,वादविवामूर्तीकला, मेहेंदी, चित्रकला इ.३२ कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला.ॲड. दत्ता पाटील लॉ काॅलेजमधील १४ विद्यार्थ्यांनी १७ कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला.या युवामहोत्सवात कु.श्रध्दा वैशंपायन या विद्यार्थीनीने सुगम संगीत गायन (प्रथम क्रमांक) आणि नाट्यसंगीत (द्वितीय क्रमांक) या स्पर्धांमध्ये यश प्राप्त करुन अभिमानास्पद कामगिरी बजावली.

कु.सायली नागोठणेकर या विद्यार्थीनीने मेहेंदी स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच वादविवाद (इंग्रजी) या स्पर्धेत कु.नवाल घोले आणि कु.आमिना कोंडविलकर या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.या सर्व विद्यार्थिनींची मुंबई विद्यापीठस्तरिय युवामहोत्सवसाठी निवड झाली आहे.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील आणि उपाध्यक्ष डॅा..साक्षी पाटील तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड. नीलम हजारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. युवा महोत्सवासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.निलम म्हात्रे,प्रा.पियुषा पाटील,प्रा.चिन्मय राणे,प्रा.कौशिक बोडस यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थी समन्वयक कु.आदित्य म्हात्रे,कु.आर्य पाटील आणि कु.विशाल पाटील यांनी संघाच्या पूर्वतयारीमध्ये हातभार लावला.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे