Breaking
कवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

आयुष्य; सुलोचना लडवे

अमरावती

0 4 0 9 0 3

आयुष्य

बहु पुण्याईने | मानवाचा जन्म |
करावे सत्कर्म | आयुष्यात ||१||

जगावे आयुष्य | आनंदाने छान |
नको अभिमान | जीवनात ||२||

येतील संकटे | करावी ती पार |
ईश्वर आधार | नामजपे ||३||

नको करू माती | आयुष्य महान |
जपा थोर सान | सुसंगती ||४||

जन्म आणि मृत्यु | जोडणारा दुवा |
कुणाचाही हेवा | नको मनी ||५||

जाणुनिया मर्म | मानवी जन्माचे |
करू आयुष्याचे | सार्थक ते ||६||

म्हणे सुलोचना | द्यावे देवा ज्ञान |
आयुष्याचे दान | परहिता ||७||

सुलोचना लडवे
अमरावती
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे