
0
5
6
8
0
0
ढगाआड तो..,!!
ढगाआड तो
लपून मजकडे पाहून,
गालात तो,
हासतोय खुदकन् ॥१॥
पहिला पाऊस
अंगावर झेलत
पुरवतोय हौस
मजा मस्तीत ॥२॥
येरे येरे पावसा
देतो,तुला
लाखभर पैसा
रेनकोट आणतो मला ॥३॥
चंदामामा म्हणे
मुलांनो थांबा
आपण,गाऊ गाणे
मी तुमचा,लाडका चांदोबा ॥४॥
ढगा आडचा तो,मीच
आपली आहे मैत्री
तुम्हाला मी सांगतो
घेऊ नका,उगा छत्री ॥५॥
श्रीमती नीला पाटणकर
शिकागो (यू एस ए)
========
0
5
6
8
0
0



