उमरेड तालुक्यातील ‘या’ जि.प. शाळेत शालेय साहित्य वाटप
शहर प्रतिनिधी रजत डेकाटे
उमरेड तालुक्यातील ‘या’ जि.प. शाळेत शालेय साहित्य वाटप
शहरातील सामाजिक कार्यकर्तीचा पुढाकार
शहर प्रतिनिधी रजत डेकाटे
नागपूर/उमरेड: उमरेड तालुक्यातील ठोंबरा अकोला पिपळा बारव्हा निरव्हा नवेगाव ई, नागोबा खैरी, वडेगाव, विरली,वेलसाखरा येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक कार्यकर्त्या इंजि.सपनाताई राजेंद्र मेश्राम व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजूभाऊ मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनाचे वितरण करण्यात आले.
या छोटेखानी कार्यक्रमाला ठोंबरा येथील शिक्षिका पल्लवी भट, अकोला येथील शिक्षक मनोहर भाऊरावजी येनुरकर, शकुंतला कटरे, पिपळा येथील मुख्याध्यापिका सौ आशा बारापात्रे, शिक्षिक अभिमान देशमुख,बारव्हा येथील मुख्याध्यापक प्रबोध धोंगडे, निरव्हा येथील मुख्याध्यापक आर.आर. घुगल, नवेगाव ई. येथील मुख्याध्यापिका रेखा कावळे, शिक्षिका माधुरी गोपसे, नागोबा खैरी येथील मुख्याध्यापिका अल्का महाजन, वडगाव येथील शिक्षक विनोद धांडे,अनिल मोहनकर, गट ग्रामपंचायत विरली येथील शिक्षिका श्रीमती मीना कोहळे, वेल साखरा येथील शिक्षिका अनिता उरकुटे मॅडम सरोज मॅडम सोरते मॅडम वाईलकर मॅडम, ग्रामपंचायत ग्रामसेवक सौ.विनाली लिंगायत,तर गावातील नागरिक संदीप सोमकुवर, विठ्ठलरावजी गजभिये, संजय मेश्राम, मंगेश शेंडे, चंद्रमणी शेंडे अंबादास कांबळे, विनोद शेंडे,घनश्याम शिंदे, दिगंबर गडपायले, नरेश मेश्राम यांची यावेळी उपस्थिती होती. इंजिनिअर सपनाताई मेश्राम यांच्या एक वही एक पेन या अभियानाला शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



