
0
4
0
9
0
3
प्रेमरंग
तू भेटलास सख्या अन्
फुटली पालवी प्रेमाची
तुझ्या डोळ्यातील भाव
नेहमीच मी वाचायची
किती आनंदी भासायच जग
असता सहवासात तुझ्यासंग
जशी फुलावी फुले रंगीबेरंगी
तसाच फुले चेहऱ्यावर प्रेमरंग
ओढ आम्हा एकमेकांची
सतत शोधायचे भेटीचे क्षण
व्हायचे वेडे एक दुसऱ्यासाठी
लागायचे नाही अपूले मन
तो प्रेमरंग आजही रंगतो मनी
जसे रंग उधळावेत धुळवडीचे
हृदयाच्या अंतरंगी तूच रे प्रिया
यावे ते क्षण परतूनी सुखाचे
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल जि.चंद्रपूर
0
4
0
9
0
3





