Breaking
कवितामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

एक होती परी

सरला टाले राळेगाव,यवतमाळ

0 4 8 2 9 0

एक होती परी

एक होती परी
सुसंस्काराचे पंख तिला
नात्यांमधली घट्ट विण
शिकवून गेली मला ॥
स्वप्नांचे मनोरे बांधण्यापेक्षा
वास्तव जगणे शिकवून गेली
वादळ उठले कितीही जीवनात
खंबीर राहणे दाखवून गेली ॥
मानापमान गिळताना
हसतांना मी पाहिले तिला
सर्वांनाच सोबत घेऊन
चालतांना मी पाहिले तिला ॥
गरजूंना मदतीचा हात
नेहमीच पुढे असायचा
अश्रू ढाळत आलाच कोणी
हसत हसत जायचा ॥
अंधश्रद्धा , नकारात्मकता
कधीच नव्हती तिच्यात
कोणतेही आव्हान पेलण्याची
जिद्द तिच्या मनात ॥
सुखाचे आगर मायेचा सागर
नैराश्याला घालवणारी आशेची फुंकर ॥
देवालाही बहुधा गरज तिची असावी
आईसारखी सुंदर परी त्याच्याकडे नसावी ॥
शेवटचा निरोप देताना
सकारात्मकता देऊन गेली
सुसंस्काराच्या जादुई कांडीने
उडण्यास पंख देऊन गेली ॥

  • सरला टाले
    राळेगाव,यवतमाळ
    ========
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे