
0
4
8
2
8
4
तुम्हावरच मर्जी
कळाले होते तेव्हाच मला
तुमच्या़शी भेट झाल्यावर
प्रेम बरसले तुम्ही माझ्यावर
जसा पाऊस बरसावा धरेवर
भावभावना मनीच्या माझ्या
न सांगता जाणले होते तुम्ही
ओसाड हृदयांगणात माझ्या
हिरवळ फुलवले होते तुम्ही
केली तेव्हा तुम्हावरच मर्जी
डोळ्यात मी स्वप्न फुलवीत
पदोपदी राहा सोबत राया
तुम्ही प्रितीचा झुला झुलवीत
आणा ना गजरा तुम्ही मला
घ्या की भरजरी पैठणी साडी
पिरमान राहू दोघे आपण राया
मज फिरवाया घ्या तुम्ही गाडी
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
=======
0
4
8
2
8
4



