अहमदनगरई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
व्यवहारी या जगात…
डाॅ. नझीर शेख, राहाता जिल्हा अहिल्यानगर

0
5
1
7
8
7
व्यवहारी या जगात…
लेवूनी मुखवटे इथे
मी फिरलो कधीच नाही
व्यवहारी या जगात
रमलो कधीच नाही
इथल्या भूलभुलैयेला
कधीच नाही भुललो
अल्प संतुष्टतेत रंगूनी
खुललो कधीच नाही
पाहूनी झगमगाट
या बेगडी दुनियेचा
अन् देखूनी वैभव जनाचे
झुरलो कधीच नाही
जमिनीत रोवूनी पाय
जीवन जगत राहिलो
बघूनी संपन्नता इतरांची
भ्रमलो कधीच नाही
लाभते कष्टात मजला
अतीव समाधान
अविरत अथक श्रमाने
दमलो कधीच नाही
डाॅ. नझीर शेख, राहाता
जिल्हा अहिल्यानगर
========
0
5
1
7
8
7



