मुख्याध्यापकांनी केला आगळा वेगळा निरोप समारंभ
नागपूर/रामटेक: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसेवाडी पस रामटेक जिल्हा नागपूर येथे वर्ग सातवीचा निरोप समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जगदीश जी शेंद्रे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अन्य सदस्य उपस्थित होते. गावातील काही मान्यवर पालक सुद्धा उपस्थित होते .वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजे मनाची घालमेल करणाऱ्या अशा ही अवस्था राहते . या अवस्थेत मुले त्यांच्या मनातील शिक्षकांबद्दल शाळेबद्दल असणाऱ्या कडू गोड आठवणी सांगतात.
निरोप घेताना सर्वांचे डोळे पाणवतात. ज्या मुलांना वर्ग पहिलीपासून शिकवले ज्यांचे बालपण आपण जगलो ते शिक्षकांबरोबर जगले. तर सगळे बालपणीच्या कडू गोड आठवणीं भरभरून बोलले. आणि खरच मन भरून येतो .ही मुले आता ज्ञानाची शिदोरी घेऊन पुढे जाणार जगात वावरतील.ही अशी शिदोरी आहे जी पुरतही नाही आणि उरतही नाही असे म्हणतात खरंच आता या वयातील अनुभव खोडकरपणा त्यांची मस्ती जाऊन आता अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन सिरीयस होतो. हे महत्त्वाचे आहे.
आजपर्यंत ते जगलेले बालपण आणि यापुढे त्यांच्या आयुष्याची करिअरची सुरुवात होणार त्याकरिता त्यांना खूप खूप आशीर्वाद देण्यात आले. शाळेतील शिक्षक श्री.सचिन kapagate सर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले .तर कु.पूजा मॅडम ने आभार प्रदर्शन व मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील स्वयंसेवक श्री.मनीष नांगरे,शुभम डोंगरे यांनी फलक लेखन करून कार्यक्रमाला सुशोभित केले तसेच गावातील माजी विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळी काढून कार्यक्रमाला हातभार लावला.आमच्या खिचडी वाल्या दोन्ही ताईंनी शिक्षक, पालक आणि मुलांसाठी सुग्रास भोजन व्यवस्था केली. प्रथम शिक्षिका सावित्री बाईचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गावातील मंडळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले.चार मार्गदर्शन शब्द सांगितले शाळेत उपस्थित सर्व शिक्षकांनी मुलांना छान मार्गदर्शन केले आणि जेवणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही त्यांना शाळेतून मुलांना बक्षीस समारंभ साजरा केला जातो 26 जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जी मुलं सहभाग घेतात त्यांच्या सहित शाळेतले सर्व मुलांना बक्षीस वाटप केली जातात यावर्षी आम्ही आज बक्षीस वाटप करताना दुसरं काहीतरी देण्यापेक्षा मुलांना उपयोगी येईल ते आता सुजाण नागरिक होणार तर त्यांचे सुजाण नागरिक याकडे पहिला पाऊल म्हणून यावर्षी आम्ही “संविधान भारतीय” संविधानाच्या प्रती मुलांना वितरित केल्या आणि त्यांनी सुजाण नागरिक व्हावे सुसंस्कृत नागरिक व्हावे याकडे पहिले पाऊल टाकण्याकरिता ही पुस्तक नक्कीच त्यांना उपयोगी ठरेल असा मानस ठेवून मुख्याध्यापिका सिंधु बोदले यांनी नवीन आणि वेगळा ठसा उमटवला आहे.
या वर्षी संविधान लागू होऊन 75 वर्षे पूर्ण झालीत.घर घर संविधान या उपक्रमा खारीचा वाटा उचलण्याचे काम सिंधू बोदेले मॅडम यांनी केले. शिक्षक हा फक्त मुलांना शालेय शिक्षण देत नाही.तर जगात उभे राहण्याचे बळ देतो.म्हणूनच बालपणात संविधान जागृती व्हावी म्हणून घर घर संविधान उपक्रम राबविला आला आहे.
त्यांना संविधान पुस्तके देण्याचे निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आला. संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले . माजी शिक्षक यांचा ही सत्कार शाळेच्या व शाळा व्यव.समिती मार्फत करण्यात आला. अशाप्रकारे यावर्षीचा निरोप समारंभ आगळावेगळा प्रकारे साजरा करण्यात आला.



