Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबई

स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पूर्व प्राथमिक व स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा, आवास मध्ये आयोजन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या पूर्व प्राथमिक व स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा, आवास मध्ये स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांच्या विसाव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्रभाकरजी राणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले.

स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, खजिनदार सुवर्ण कांबळी, सभासद अभिजीत राणे, सामाजिक कार्यकर्ते देविदास म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सहाय्यक शिक्षक धनंजय भगत सर यांनी आपल्या मनोगतातून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.इ. ४ थी मधील अक्षरा खैरे, पूर्वा सोन्नर, आर्वी म्हात्रे या विद्यार्थीनींनी अतिशय सुंदर भाषणे करून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाला ग्रुप – ग्रामपंचायत सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, सचिव प्रभाकर म्हात्रे, खजिनदार सुवर्ण कांबळी, उपसचिव त्र्यंबक फाटक, सभासद अभिजीत राणे, सभासद सुहास म्हात्रे, सभासद दिपक राऊळ, सभासद जयवंत म्हात्रे, सभासद अनिल राऊळ, सभासद राजेंद्र वाकडे, सामाजिक कार्यकर्ते देविदास म्हात्रे, अभिजीत राणे यांच्या कन्या आर्वी अभिजीत राणे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, बालवाडी प्रमुखा रणिता म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील सर्व शिक्षक,सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व इ. १ ली ते इ. ४ थी पर्यंतचे सर्वं विद्यार्थी उपस्थित होते.

स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक विनोद नागे सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर सहाय्यक शिक्षिका दिपाली साबळे मॕडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे