Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

जे. एस. एम. महाविद्यालयात राज्यशास्त्रातून करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 6

जे. एस. एम. महाविद्यालयात राज्यशास्त्रातून करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (शुक्रवार दि. 20) जे.एस.एम. महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाद्वारे “राज्यशास्त्र विषयातून करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. या व्याख्यानासाठी वीर वाजेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप घोडके प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आय पी. कोकणे, उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. पंकज घरत, प्रा. मोनिका पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. संदीप घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, राज्यशास्त्र विषयातुन विद्यार्थ्यांना भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. विविध स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयाची विशेष मदत होते. तसेच प्रा. डॉ. संदीप घोडके यांनी विद्यार्थ्यांनी समाजातील एक जागरूक नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य काय आहेत याची जाणीव ठेऊन वर्तन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आय. पी. कोकणे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. पंकज घरत यांनी केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे