Breaking
कवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

हिरव्या स्वप्नांची चाहूल

अंकुश सालपे ता. जिल्हा ‎नागपूर

0 6 3 0 2 8

हिरव्या स्वप्नांची चाहूल

‎माळरानावर हिरवी चाहूल, वाऱ्याची गोड गाणी,
पानोपानी जागी झाली, नव्या आशेची वाणी।
थेंब थेंब पावसाच्या, मोत्यांची बरसात,
हिरव्या स्वप्नांनी सजली, धरतीची प्रभात॥
‎
‎रानफुलांच्या गंधामधुनी, दरवळते आनंद,
पाखरांच्या किलबिलाटात, फुलतो नवा छंद।
डोंगर माथा हसतो आहे, नदी गाते गीत,
हिरव्या या स्वप्नांसाठी, मन होते प्रीत॥
‎
‎कुऱ्हाडीच्या घावाखाली, झाडे रडती आज,
धुराच्या या वादळाने, हरवला निसर्गसाज।
थांबवू या विनाशाला, धरू मातीचा हात,
वृक्ष लावून जपूया सारे, हिरवी धरतीमात॥
‎
‎हातामध्ये हात घेऊ, करू नवा संकल्प,
हिरवाईच्या संगतीने, फुलवू सुंदर कल्प।
पानोपानी आशा फुलो, दरवळो प्रेमगंध,
हिरव्या स्वप्नांच्या वाटेवर, उजळो जीवनछंद॥

‎
‎अंकुश सालपे
ता. जिल्हा ‎नागपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 0 2 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे