ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडासाहित्यगंध
नियती
विष्णू संकपाळ बजाजनगर छ संभाजीनगर

0
5
1
7
9
5
नियती
कधी आपल्याच अपयशावर
आपण उगाच कन्हत असतो
आणि नियतीने डाव साधला
असेच आपण म्हणत असतो.. //
उलट थोड्याफार यशाचेही
श्रेय स्वतःकडे घेत असतो
नियती वगैरे शुद्ध बकवास
सोयिस्कर फाटा देत असतो.. //
अनपेक्षित वा धक्कादायक
हाच नियतीचा डाव असतो
तोंडचा घास हिरावला जाणे
नियतीचा वर्मी घाव असतो… //
आत्मनजरेत अपराधीपण
हाच पुरावा ग्राह्य असतो
जशी करणी तशीच भरणी
हा नियतीचा न्याय असतो.. //
ज्याच्या त्याच्या कर्माचा
नियती कडे हिसाब असतो
पापपुण्याच्या लेखा जोखा
प्रत्येकाला किताब असतो.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ संभाजीनगर
=========
0
5
1
7
9
5



