मधुकर्णिका सासवडे यांना वाजपेयी पुरस्कार प्रदान
वसुधा नाईक पुणे
मधुकर्णिका सासवडे यांना
वाजपेयी पुरस्कार प्रदान
वसुधा नाईक पुणे
पुणे :(दि 25 ऑगस्ट): शहरातील आघाडीच्या कवयित्री आणि मधुकर्णिका फौंडेशन संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा मधुकर्णिका सारिका सासवडे यांना भाजप सांस्कृतिक विभागातर्फे पहिल्या विश्वकाव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी स्मृती काव्य पुरस्कार जाहिर रित्या प्रदान करण्यात आला.
भाजप आणि समाजातील उच्च आदर्शवादी संस्थांच्या संस्कारामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून योगदान देण्याबरोबरच शाश्वत काव्यलेखनाच्या दृष्टिकोनातून चार पावलं पुढे टाकू शकत आहे, असे पुरस्काराला उत्तर देताना मधुकर्णिका सासवडे यांनी सांगितले.अटल बिहारी वाजपेयी यांनी कौरव कोण, पांडव कोण हे ओळखून विरोधकांचे समाज अहितकारक तांडव नृत्य थोपवले आणि तोच वारसा पंतप्रधान मोदीजी पुढे कौशल्याने चालवत आहेत, असे प्रतिपादन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
अध्यक्ष स्थानी बीजेपी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर अध्यक्ष पोपटराव गायकवाड होते. ज्येष्ठ साहित्यिक मंदा नाईक तसेच कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग, उपाध्यक्ष शैलजा सोमण आदिंचीही याप्रसंगी भाषणे झाली.डाॅ.घाणेकर संपादित डहाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या
तुळशीराम उणेचा, बाळासाहेब
भिंगारकर,रवि भगवान, सुधाकर मोरवणकर, सुधीर पाचपोर ,दिलिप खंडागळे भगवानदास मोहिते, दिलिप खंडागळे आदि मान्यवर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पोपटराव गायकवाड आणि डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.उत्तरार्धात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे सामाजिक समरसता काव्य संमेलन झाले. श्रध्दा शिंदगीकर, अनघा सावनूर आगाशे, नंदकिशोर गावडे, राहुल भोसले, शैलजा सोमण,श्रीनिवास तेलंग, मधुकर्णिका सासवडे , मंदाताई नाईक आदिंनी कविता सादर केल्या. ऋचा कर्वे यांनी सूत्रसंचालन केले.प्रारंभी सुधीर पाचपोर यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. गायकवाड आणि डाॅ.घाणेकर यांनी वाजपपेयी
यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.



