
0
5
7
4
4
7
दीप अंतरीचा
ढगांच्या चादरीने सूर्य आच्छादलेला
का आज हृदयात अंधार दाटलेला..
गर्द काळोख हा भवताली वेढलेला
का त्या गाभाऱ्यात तो दिप विझलेला..
पडू दे प्रकाश उजळून टाक भिंती
मनमंदिरात आज लाव एक पणती..
फुटेल प्रेमपान्हा जरी स्नेह विझलेला
गाडून टाक द्वेष, अंतरी साठलेला..
जीव इवला परि पळवेल संकटाला
जमून सारे कवडसे येतील सोबतीला..
फक्त उजेडाचीच ठेव आस तू मनाला
होईल दिव्यप्रकाश, दीप अंतरी पेटलेला..
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
0
5
7
4
4
7



