
0
4
0
9
0
3
जिवलगा
कधी कधी वाटायचं
आपलही कुणी असावं
हक्काने आपण कधीतरी
त्या व्यक्तीवर रूसावं
मन मोकळ करतांना
त्याच्या खांद्यावर टेकावं
त्याची प्रेमळ साद येताच
हृदयात त्याच्या बसावं
आयुष्याच्या वाटेवर तो
भेटला अनाहूत जिवलग
दिलासा देणार त्याचं बोलणं
ऐकून झाले मी त्याच्यात दंग
जीवलगासवे प्रत्येक क्षण
फुलवी हसू मज चेहऱ्यावर
हाच का तो सखा मनातील
फुलवी खळी मज गालावर
नात त्याच माझं जगण्याची उमेद
ओढ लावली हळव्या मनाला
जीवलगा श्वासातला श्वास तू
नकळत तुझ्यात जीव अडकला
प्रतिमा नंदेश्वर
मूल जि.चंद्रपूर
0
4
0
9
0
3





