ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडासाहित्यगंध
उत्तरार्ध
विष्णू संकपाळ बजाजनगर जि.छ. संभाजीनगर

0
4
0
9
0
3
उत्तरार्ध
वर्तमानातील खटाटोप
पलापलाने ठरतो पूर्वार्ध
अज्ञात तरीही स्पष्ट होतो
कलाकलाने गुढ उत्तरार्ध… //
भविष्य बनावे सुखकर
म्हणून आयुष्य पडे खर्ची
तारूण्यातील कष्ट व्हावे
वृद्धापकाळी आरामखुर्ची… //
ठरवावे तसेच होत नसते
जे होते तेही ठरलेले नसते
ते कुणी समजते कर्मभोग
कुणा लेखी प्राक्तन असते… //
हिम्मत कधीच हारू नये
विफल होताच पराकाष्ठा
सफल होण्या जीवनगाथा
कधी ना ढळावी कर्मनिष्ठा… //
सत्व, तत्व, आणि सत्कर्म
हाच असे ज्याचा राजमार्ग
हेच पूर्वार्धातील खरे संचित
सुनिश्चित करेल उत्तरार्ध… //
विष्णू संकपाळ बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
0
4
0
9
0
3





