0
4
8
3
0
0
करामती
धुंद वाऱ्याची झुळूक
गोंजारते सर्वांगाला
हृदयी वाढे धाकधूक
सांगू दशा रे कुणाला?
फुलांची मस्त आरास
श्वास सुगंधित करी
मिळेल का आसपास
करामती ती कस्तुरी
हुंगता कस्तुरीगंध
रोमांचित तन झाले
जुळवून स्नेहगंध
ढग नभांगणी आले
चिंब बरसल्या सरी
हुडहुडी भरलीया
ऊबदार स्पर्शापरी
स्फुर्तीदायी ठरलीया
प्रेमांकुर हृदयांगणी
येता झुळूक डुलतो
करामती तिची वाणी
शब्दगंधाने खुलतो
करामती प्रीतवारा
छेडतोय हृदय तारा
थांबता पाऊसधारा
गाणं गातोय पारवा
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
======
0
4
8
3
0
0



