
0
6
0
5
0
3
नंदाघरी आला कान्हा
नंदाघरी आला कान्हा
घेऊनी आनंद न्यारा
मुरलीच्या मंजुळ स्वरांत
मोहरला गोकुळ सारा..!!
माखनसाठी हट्ट त्याचे
करी गोड गोड बहाणा
लोण्याच्या मडक्यांमध्ये
शोधी आपला खजाना…!!
राधेच्या निर्मळ प्रेमामध्ये
कृष्ण रंगला न्यारा
प्रेमभक्तीचा संदेश देई
जगाला तो प्यारा…!!
गोवर्धन पर्वत उचलुनी
वाचविले जन सारे
इंद्राच्या कोपापासुनी
रक्षिले गोकुळ प्यारे..!!
कृष्णजयंती घरोघरी
विश्वाचा तो पालनहार
कृष्णनाम घेता नित्य
मना आनंद मिळे अपार…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता जि बीड
=========
0
6
0
5
0
3



