Breaking
ई-पेपरकवितामुंबईसाहित्यगंध

कस्तुरीमृग

रजनी भागवत ऐरोली, ठाणे

0 6 5 6 0 5

कस्तुरीमृग

सुखाच्या वाटा शोधण्या निघाला
धुंडाळल्या सर्व दिशा
चंचल मन परि न रमले
जमविल्या अनेक जिन्नसा

सुंदर प्रासाद, दारी वाहन
झोपाळाही झुले अंगणात
परि वेळ न मिळे त्यासं
क्षणैक त्यावरी रमण्यात

बाह्यजगी यशस्वी तो
लोकांना सदा हसरा दिसे
अंतरगी परि उदास
सूर न त्याचा त्यास गवसे

उरीफुटेस्तो धावणे लिहीले
स्वतःच स्वतःच्या नशिबी
क्षणभर विसावा घेऊन बघ
काय दडलयं अंतरंगी

सुख समाधन असे
मानवा कस्तुरीमृगा परि
तुज तुजपाशी गवसता
सुखगंध दरवळेल तुझ्या जीवनी

रजनी भागवत
ऐरोली, ठाणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 6 0 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे