मुंबई विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
मुंबई विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: दि. २९ सप्टेंबर २०२५ ते दि. १ अॉक्टोबर २०२५ रोजी पोलिस मुख्यालय, कळंबोली- नवी मुंबई येथे मुंबई विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या पुढील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक खेळ करून घवघवीत यश संपादन केले.
*१७ वर्षे वयोगट मुलगे (ग्रीको रोमन कुस्ती)*
१) केतन केंडे, इ. ९ वी [ ४५ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
*१४ वर्षे वयोगट मुलगे-*
१) यश गोरे, इ. ९ वी [ ५२ कि.ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*
*१९वर्षे वयोगट मुलगे (ग्रीको रोमन कुस्ती)*
१) भरत गडखळ, इ. १२ वी [ ५५ कि.ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*
२) चैतन्य जमादार, इ. १२ वी [ ६३ कि. ग्रॅ. ] *द्वितीय क्रमांक* केतन केंडे, इ. ९ वी [ ४५ कि. ग्रॅ ] या प्रथम क्रमांक संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ह्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान सरचिटणीस तथा बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य प्रमोद भगत सर व विद्यमान क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





