कॉ. डॉ. डी. एल. कराड यांची उद्या संविधान चौकात जाहीर सभा
महसूल सेवक आंदोलनाला पाठिंबा देत आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे धरणे कार्यक्रमात मार्गदर्शन
नागपूर: (दि ०३) आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर जिल्हा तर्फे ४ ऑक्टोबर रोजी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे जानेवारीपासून असलेले केंद्र शासनाचे थकीत मानधन, ऑनलाईन डाटा एन्ट्रीची सक्ती बंद करा व के. टी. नगर यू पी एच सी मधील आशा वर्कर यांची प्रताडना करणाऱ्या मेडिकल ऑफिसर यांची तात्काळ महानगरपालिकेने बदली करावी.अशा विविध मागण्यांना घेऊन नागपूरच्या संविधान चौकात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
त्यासोबत १३ सप्टेंबर पासून संविधान चौकात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नेमणूक करा या मागणीला घेऊन महसूल सेवक कर्मचारी सतत धरणे आंदोलन करीत आहेत. ४ ऑक्टोबर पासून महसूल सेवक आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहेत. दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता सी आय टी यू राज्य अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य संयोजक – कॉ. डॉ. डी. एल. कराड यांचे सकाळी आगमन होत असून ठीक २ वाजता कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. अशी माहिती आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर जिल्हा अध्यक्ष – कॉ.राजेंद्र साठे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.





