आगरी समाज संस्था अलिबागतर्फे ‘विवाह मिलन’ पोर्टलचा भव्य शुभारंभ
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
आगरी समाज संस्था अलिबागतर्फे ‘विवाह मिलन’ पोर्टलचा भव्य शुभारंभ
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (प्रतिनिधी) :आगरी समाज संस्था अलिबाग यांनी आधुनिकतेकडे वाटचाल सुरू ठेवत समाजाच्या सर्वांगीण विकासात उल्लेखनीय काम करत असताना आता विवाह व्यवस्थेतही नवीन पर्वाची सुरुवात करण्यात आली आहे. संस्थेच्या सर्वजातीय वधू-वर परिचय केंद्राला आता ऑनलाईन स्वरूप देण्यात आले असून www.vivahamilan.com या पोर्टलचा भव्य शुभारंभ गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता अलिबाग येथे हॉटेल गुरुप्रसाद हॉलमध्ये झाला. हा शुभारंभ डॉ. जगन्नाथ पाटील व डॉ. दीपक पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी स्वागतपर भाषणातून संस्थेची ओळख, उद्दिष्टे आणि vivahamilan.com पोर्टलची संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी पुस्तक पेढी, करिअर मार्गदर्शन, वृक्षारोपण, सर्वजातीय वधूवर केंद्र आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी चालविलेल्या उपक्रमांची तसेच संस्थेच्या पारदर्शक आर्थिक व्यवहाराची माहिती दिली. तसेच भावी प्रकल्प म्हणून भव्य आगरी समाज भवन उभारण्यासाठी समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
डॉ. जगन्नाथ पाटील यांनी आगरी समाज संस्थेच्या कार्याचे कौतुक करत समाजातील लोकांनी एकत्र येऊन योगदान द्यायला हवे असे सांगितले. त्यांनी आगरी समाज भवनासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. ॲड. प्रसाद पाटील यांनी लग्न व्यवस्थेवर कायदेशीर अनुभवातून मार्गदर्शन करत संस्थेच्या नाविन्यपूर्ण कार्याचे कौतुक केले. पोर्टलचे सविस्तर प्रेझेंटेशन सौ. वेदांती म्हात्रे यांनी केले.सूत्रसंचालन सौ जागृती पाटील यांनी तसेच आभारप्रदर्शन ॲड. सचिन पाटील यांनी केले. तसेच श्री उदय म्हात्रे, आदर्श सरपंच, ग्रामपंचायत नारंगी, यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ वास्तुविशारद सुजाता म्हात्रे, हॉटेल व्यवसायिक मंगेश दामोदर म्हात्रे, सफल उद्योजक रणजीत शांताराम म्हात्रे, बांधकाम व्यवसायिक प्रविण घरत, जिल्हा सरकारी वकिल ॲड प्रसाद शांताराम पाटील, वरिष्ठ सिव्हिल इंजिनिअर प्रसाद बाळाराम पाटील, बांधकाम व्यवसायिक सुरेश गोपाळ पाटील, समाजसेवक धनंजय म्हात्रे, पतसंस्था क्षेत्रातील आणि संस्थेचे मार्गदर्शक अनंत म्हात्रे, इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर राजेश पाटील, माजी पतसंस्था चेअरमन सतिश पाटील, ज्येष्ठ सामाजिक क्षेत्रात काम करणारे विलास ठाकूर, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
vivahamilan.com पोर्टलच्या निर्मितीसाठी संजीव म्हात्रे (यश कन्सल्टन्सी), प्रोजेक्टर अशिष रणदिवे (युनिक कंम्प्युटर), प्रोजेक्टर चालक मिलिंद पाटील (मोरया कंम्प्युटर), बॅनर-प्रिंटिंगसाठी अभिजित पाटील (Slash Graphix), सुनिल ताबडकर व त्यांचा कर्मचारी वर्ग तसेच फोटोग्राफर तुषार थळे (तुषार फोटो स्टुडिओ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील तांबडकर, सेक्रेटरी प्रभाकर ठाकूर, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, वैभव पाटील, उदय म्हात्रे, बिपीन टेमकर, कुमार म्हात्रे, श्रेयस पाटील, पार्थ पाटील, अद्वैत पाटील, सौ दिपश्री पाटील, सुप्रिया पाटील, दर्शना पाटील, सई पाटील यांनी मेहनत घेतली.
आगरी समाज संस्था अलिबाग संचलित vivahamilan.com हे पोर्टल समाजातील विवाह व्यवस्थेसाठी आधुनिक, सुलभ आणि पारदर्शक व्यासपीठ ठरणार असून “मिलन प्रेमाचं, परंपरेच्या पवित्र बंधनाचं” या ब्रीदवाक्यासह समाजकार्यातील एक नवा टप्पा गाठला आहे.





