लठ्ठपणा आणि स्त्रियांचे आरोग्य : आहार विषयक संबंध” या बाबत जे. एस. एम महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
लठ्ठपणा आणि स्त्रियांचे आरोग्य : आहार विषयक संबंध” या बाबत जे. एस. एम महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि ३ रायगड): जनता शिक्षण मंडळाचे जे. एस. एम. महाविद्यालय अलिबाग, महाविद्यालयाचे एन एस एस युनिट, महिला विकास कक्ष व अंतर्गत समिती व लायन्स क्लब, अलिबाग यांच्या मार्फत विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि स्त्रियांचे आरोग्य या संदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत असताना डॉ. रेखा म्हात्रे यांनी प्रतिपादन केले कि, लठ्ठपणा आणि स्त्रियांच्या आरोग्यामध्ये आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे. संतुलित आहाराचा अभाव, जास्त कॅलरीजचे सेवन, प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणा येऊ शकतो, ज्यामुळे मधुमेह, हृदयरोग, काही प्रकारचे कर्करोग आणि वंध्यत्व यांसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असलेला आहार लठ्ठपणा कमी करण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तसेच या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी हि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच श्रुती सरनाईक अध्यक्ष लायन्स क्लब अलिबाग व इतर लायन्स क्लबचे सदस्य कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला विकास कक्ष आणि अंतर्गत समिती प्रमुख प्रा. वर्षा पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकात महिलांनी आणि मुलींनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य आहार व तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे असे सांगितले.





