0
4
8
2
9
3
हाताची घडी
ऑफिस मधून येईपर्यंत
शुद्धलेखन लिहा
हाताची घडी बडबड नको
मुलांनो शांत रहा.
शुद्धलेखन लिहून झाले
हळूहळू आवाज वाढला
कुणी केल्या खोड्या
कुणी गळा काढला .
गुरुजी येताच वर्गात
पकडले आपापले बाक
गुरुजींचा चढला पारा
म्हणे एवढा नाही धाक.
बंड्या आण तुझी वही
नाही लिहिले गुरुजी
हाताची घडी तोंडावर बोट
कसे लिहिणार गुरुजी.
उलट उत्तरे देतो
घे हातावर छडी
हाताची घडी सोडू गुरुजी
की मारू कोलांटी उडी.
विमल धर्माधिकारी
वाई,जि.सातारा
0
4
8
2
9
3



