पोपटराव गायकवाड यांना भारतरत्न स्व. वल्लभभाई पटेल शताब्दी पुरस्कार जाहीर
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पोपटराव गायकवाड यांना भारतरत्न स्व. वल्लभभाई पटेल शताब्दी पुरस्कार जाहीर
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे:(दि 9 नोव्हेंबर) : राष्ट्रीय सेवक संघ तसेच जनसंघ.जनतापार्टी.. तसेच भारतीय जनता पार्टी यासाठी गेल्या 55 वर्षांहून अधिक काळ अविरतपणे समर्पित भावनेतून योगदान देत असलेल्या श्री.पोपटराव गायकवाड यांना भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडी-सांस्कृतिक विभागातर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार जाहीर केला असल्याचे BJP चे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी कळवले आहे.
सदर पुरस्कार वितरण BJP ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्री.श्रीनिवास तेलंग यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.हा सोहळा शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात (डिपी रोड , घरकुल लाॅन्स समोर ; पुणे) होणार आहे. याच कार्यक्रमात सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन देखिल करण्यात येणार आहे.पोपटराव गायकवाड हे भारतीय जनता पार्टी ,ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर अध्यक्ष आहेत.





