
0
5
1
7
5
8
आभास हा
का होतोय आभास हा
पुन्हा पुन्हा या मनाला
तू सोबत चालतो आहेस
सभोवती हेच भास मजला
आठवणीत नि विचारात
तूच असतोस अजुनही
तुझा तो हसरा चेहरा
डोळ्यातून जात नाही
सोबत घालवलेले ते क्षण
आनंदी विसरताही येत नाही
प्रेम म्हणू की माझा वेडेपणा
शब्दात सांगताही येत नाही
आभास हा तुझा जीवघेणा
विरह,वेदना साहवत नाही
प्रेमाची एक एक आठवण
सख्या हृदयातून जात नाही
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल जि.चंद्रपूर
0
5
1
7
5
8



