
0
5
1
7
5
8
नियती
नियतीच्या पटावरील
प्यादे आपण सगळे
कळत नाही खेळ तिचा
डाव तिचे आगळे
डावपेचांचे फासे टाकून
हात तिचे मोकळे..
तालावर तिच्या गुमान
चालत राहतात सगळे..
तिरके चालणाऱ्याला
नेहमी मिळते सरळ संधी ..
अन् सरळ चालणाऱ्याचाच
घात होतो आधी..
शिकार होता वजीराची
डाव संपून जातो..
तरीही का पुन्हा
जीव त्यातच गुंततो..
हेही असेल का असे
नियतीचेच देणे..
सगळं काही समजूनही
काहीच न उमजणे..!
स्वाती मराडे-आटोळे
ता.इंदापूर, जि.पुणे
0
5
1
7
5
8



