
0
4
0
8
9
0
कालची तू, आजची तू
काल पुरणपोळी होतीस,
आज ठेचा मिरचीचा,
गोडवा गेला कुठे,
दाटतो डोळा पाण्याचा.
काल मखमली हात तुझे,
स्पर्श सौम्य वाटे,
आज झालेत काटे,
स्पर्श जळतो जणू आगीचा.
काल चालताना सारे
थांबायचे पाहायला,
आज वळवटी फिरवतात,
टाळती मार्ग एकाचा.
काल वाटे नायिका
तू चित्रपटातली,
आजसाठी नाहीस तू,
पण हरवलीस का काहीचा?
परत बनू शकतेस तू
पुन्हा तशीच नायिका,
खचून नकोस जाऊ,
सोड मार्ग संघर्षाचा.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
======
0
4
0
8
9
0





