0
4
8
3
0
0
पापणकाठ
कधी येईल पाखरू
आस दाटली मनात
दूर देशी उडाले
छबी उरली डोळ्यांत
सुनी झाली बाग
नयनी दाटले पाणी
जित्यापणी पाहिल रे
राजा तुझी राणी
वाट पाहून थकला
मृत्यू शय्येवर झोपला
आठवांना मागे ठेवून
सूर्य बापाचा लोपला
शेवटची घेईन भेट
डोळे मिटेन शांत
ओलावले पापणकाठ
नसे मनी भ्रांत
डॉ.सौ.मंजूषा साखरकर
ता.ब्रह्मपुरी,जि.चंद्रपूर
========
0
4
8
3
0
0



