Breaking
ई-पेपरनागपूरमहाराष्ट्रराजकियविदर्भ

मुख्यमंत्र्याच्या शहरात दिव्यांग मतदाराचे हाल ‘आखो देखी’

नागपूरच्या मनिष नगर येथील बुथ क्र ७१ वर दिव्यांग मतदाराने ऐकवली गाथा

0 4 8 2 8 4

मुख्यमंत्र्याच्या शहरात दिव्यांग मतदाराचे हाल ‘आखो देखी’

नागपूरच्या मनिष नगर येथील बुथ क्र ७१ वर दिव्यांग मतदाराने ऐकवली गाथा

दिव्यांगासाठी सोय सुविधेचा अभाव; का करावे मतदान दिव्यांगाचा सवाल

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर

बिनधास्त न्यूज मिडीया नेटवर्क

नागपूर: (दि १५): राज्यात २९ महानगरपालिकेची निवडणूक आज (दि १५) संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ‘आखो देखी’ दिव्यांग मतदाराची गाथा प्रस्तूत प्रतिनिधीनी सांगितली. पूर्वीपासूनच हा अभाव आहे पण आजवर कुणी दिव्यांग मतदार हे सांगायला पुढे सरसावला नाही. कारण निवडणूक ही तब्बल आठ वर्षानंतर आज होऊ घातली आहे. मतदार राजा मतदान करायला यापूर्वी कधी आला हे ही नीट सांगता येत नव्हते.

नागपूर शहरातील उच्चभ्रू असलेल्या मनिष नगर येथील इंटेली टाॅट्स बुथ क्र.७१ या शाळेत मतदान करीता मतदारांना विशेष करून दिव्यांग मतदार असलेल्या अनेकांना असुविधेचा सामना करावा लागला.

राजकुमार पंढरी इंगळे दिव्यांग असुन यांना मतदान कक्षेत जायला रॅम्प नव्हते. इतकेच नव्हे तर पोलिसांनी उचलून यांना मदत केली. अरुंद दरवाजातून व्हिलचेयर आत जाण्यासाठी बरेच अडचणी आल्या. खोलीत गेल्यावर ईव्हीएम मशीन पर्यंत हात पोहचत नव्हता. यासाठी सगळे मशीन हलवून हात पुरेल असे मदत कार्य पोलिसांनी राबवले.

परंतु हे सगळे करताना वेळ किती वाया गेला आणि इतरांना ताटकळत उभे रहावे लागले. मशीनवर मत नोंदविले. पण व्हीलचेअर व मशीन यातील अंतर कमी असल्याने पलटतांना आणखी अडचणी आल्या. पोलिसांना परत मशीन हलवून राजू इंगळेंना बाहेर काढावे लागले.

मतदार दिव्यांग असल्याने यांना उचलून नेतांना बोटाला इजा झाली. तसेच मानेला झटका लागल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर झालेल्या अडचणी लक्षात घेता चेतन शिराळकर व चेतन कवळते यांनी त्यांना घरापर्यंत पोहचविले. मुख्यमंत्र्याच्या नगरीतच असुविधा बघून यंदा शेवटचं मतदान असेल, यानंतर मतदान करणार नाही असेही राजकुमार इंगळे प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले.

दिव्यांग मतदाराच्या अडचणी लक्षात घेऊन बुथ ठेवावे असेही ते म्हणाले. यंदा त्यांच्या बुथमधे बदल झाला घराजवळ असलेले बुथ सोडून लांबवर दिलेल्या बुथमुळे नागपुरातील अनेक मतदारांनी प्रशासन, निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे