Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननवी दिल्लीनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

प्राचीन संस्कृतीमध्ये एकतेची भावना”; संदीप कवीश्वर आयसीसीएस संयोजक

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 4 7 4 5

प्राचीन संस्कृतीमध्ये एकतेची भावना”; संदीप कवीश्वर आयसीसीएस संयोजक

पदव्युत्तर इतिहास विभागात आयसीसीएस नागपूर चाप्टरचे व्याख्यान

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २२) प्राचीन संस्कृतीमध्ये एकतेची भावना असल्याचे प्रतिपादन आयसीसीएस नवी दिल्लीचे मुख्य संयोजक श्री संदीप कवीश्वर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागात सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास केंद्र नागपूर चाप्टरच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी श्री. कवीश्वर मार्गदर्शन करीत होते.

माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित व्याख्यान कार्यक्रमाला आयसीसीएस नवी दिल्लीचे मुख्य संयोजक श्री संदीप कवीश्वर, श्री अनिकेतजी पिंगळे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संपूर्ण जगात सांस्कृतिक एकता प्रस्थापित करण्यासाठी ‘वसुधैव कुटुम्बक’ हे तत्व स्वीकारून संपूर्ण जग हे एक परिवार आहोत असे श्री संदीप कवीश्वर पुढे बोलताना म्हणाले. आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीत सामाजिक एकतेला महत्त्व होते. भारतीय जनजाती समूहामध्ये एकतेला आणि सामूहिक निर्णयाला फार महत्त्व आहे. जगातला सर्व मानव समूह सांस्कृतिक दृष्ट्या एकमेकांशी जोडलेला आहे. जगातील सर्व प्राचीन संस्कृतींना आणि सभ्यतांना वसाहतीक विचारधारेने मूळ विचारापासून दूर नेले. त्याला पुनर्जीवित करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे संदीप कवीश्वर म्हणाले.

श्री. कवीश्वर यांनी आयसीसीएसच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आयसीसीएसद्वारे चालविल्या जाणाऱ्या शॉर्ट टर्म, लॉंग टर्म कोर्सेस तसेच इंटरनॅशनल, संशोधनाकरिता दिली जाणारी फेलोशिप याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि आयसीसीएस यांच्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराबाबत (MOU) माहिती दिली.‌ सामंजस्य कराराच्या माध्यमातून इतिहास विभागात येणाऱ्या सत्रात दोन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अलिशा सहाय यांनी केले तर आभार डॉ. रामभाऊ कोरेकर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे