0
4
8
2
9
3
सांधत जावे
एकतेच्या सुईतील सूक्ष्म
समतेचा सुज्ञ धागा व्हावे
दुभंणाऱ्या दुखी मनाला
सोम्य शब्दाने सांधत जावे
तुक्याच्या विनेतील मर्म
अभंगाचे सुगमसंगीत व्हावे
ज्ञानाच्या मुक्त मुखातील
पवित्र पसायदान घ्यावे
जात जाईल मना मनातील
साधू संतांना समजून घ्यावे
माणुसकीच्या पंढरीचा
निरंतरढं वारकरी व्हावे
क्षण वेचण्या सुखातील
दुःखनाही कवटाळून घ्यावे
मोह माया टाळून एकदा
बुद्धांना न्याहाळून घ्यावे
निसर्गाच्या सानिध्यात संथ
निर्झर नितळ झुळझुळ व्हावे
रंग प्रेमाचे होऊन मनाच्या
क्षितिजावर सांडत जावे
प्रकाश पुंडलिक गोधने
बाचोटीकर ता.कंधार जि. नांदेड
0
4
8
2
9
3



