Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

साहित्यसेवा

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 5 3 6 2 3

साहित्यसेवा

नसे कुणाशी स्पर्धा ईर्षा
अन् नसेच कुणाचा हेवा
दान इतुकेच दे गा देवा
घडो हातून साहित्यसेवा.. //

धन्य झालो इथे जन्मूनी
पूण्यभूमी महाराष्ट्र देशा
धन्य धन्य मला लाभली
ही मायमराठी मातृभाषा.. //

पडता पडता बाळ जसे
शिकते हळूच चालायला
चुकता चुकता तसाच मी
शिकू लागलो लिहायला..//

उपमा,प्रतिमा,प्रतिकातून
घेवू लागे प्रतिभा आकार
नवरसादी अलंकारातून
होवू लागे कविता साकार.. //

इथून घेऊनी इथेच देतो
होतो केवळ निमित्त मात्र
असा छंदच जडला मला
साहित्यसेवेचा अहोरात्र.. //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे