कवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
सुखाच्या वाटा; बळवंत डावकरे

0
4
0
9
0
3
सुखाच्या वाटा
बांधून खूणगाठ मनाशी
फिरतो आहे दाहीदिशा
सर करता डोंगर दुःखाचे
जीवनाची होतेय दुर्दशा
नशीबाच्या चक्रव्यूहाने
जखडलो मी चहुबाजूंनी
संकटांची सुरु मालिका
जातो हवालदिल होऊनी
आशेच्या या हिंदोळ्यावर
शोधतोय सुखाच्या वाटा
धावतो वेगे मृगजळामागे
ह्रदयाला निराशेचा काटा
सुख म्हणजे काय असतं?
विचारला प्रश्न मज मनाला
चार घास मुखात आनंदाचे
निवांत निद्रा लागावी देहाला
पाहिलं डोकावून अंतर्मनात
दिसल्या मज सुखाच्या वाटा
विश्वरुपापेक्षा पहा रे स्वरुप
ऐहिक सुखाच्या सोड पळवाटा
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=======
0
4
0
9
0
3





