Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

घातपात; विष्णू संकपाळ

0 4 8 2 9 7

घातपात

आजकाल मरणच
झालय इतकं स्वस्तं
जणू दाही दिशांना
मृत्यू घालतोय गस्त…//

जगण्याची वाटते भिती
ठेवावी कुणावर भिस्त
कालचे मित्र आजचे वैरी
विश्वास होतोय फस्त…//

नैतिकतेची चाड नाही
आपल्याच मस्तीत मस्त
स्वार्थाआड येणार्‍याचा
राजरोस होतोय अस्त…//

कांही केल्या कळेना
काय खोटे काय रास्त
संशय आणि गैरसमज
सुसंवाद झाला दुरापास्त..//

दिवसा ढवळ्या खून
व्यवस्थाही झालीय त्रस्त
कुणी कुठे ठेवावे लक्ष
जो तो स्वतःतच व्यस्त…. //

घात की अपघात प्रश्न…?
उमदे जीवन उध्वस्त
हत्या की आत्महत्या.. ?
सारे गुलदस्त्यात बंदिस्त… //

विष्णू संकपाळ, बजाजनगर
छ. संभाजीनगर
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे