
0
5
2
4
6
0
समाजसेवक
समाजसेवकाचे, नुसते ढोंग आहे।
स्वार्थापोटी सगळे,करते सोंग आहे।
देणगी करी गोळा ,भक्कम रकमेची।
जयंती भाषणाची,व्याख्यान उत्सवाची।।
भोळा समाज येई,ऐकून त्यांना घेई।
जातांना मग त्याला,शिव्याच खूप देई।।
भोंदूगिरीचे धंदे, चालते सालोसाल।
तो नायक लुटूनी ,मिरवी मालामाल।।
भीम, गाडगे बाबा,तुकड्या, तुकाराम।
आज दिसत नाही,या माणसात श्याम।।
पैसा पैसा म्हणूनी, विसरले मुल्यांना।
पर्वा मुळीच नाही,मायबाप साल्यांना।।
फक्त पांढरपेशी ,अंतकरणी काळे।
फेकती फसवाया ,तुला मलाच जाळे।।
माणूस ओळखूनी,माणसाशी वाग रे।
माणूसकीविन होई,तू विषारी नाग रे।।
भूतदया करुणा,कर रंजल्याची सेवा।
तेव्हाच विधात्याचा,मिळेल गोड मेवा।।
गोवर्धन तेलंग
ता.पांढरकवडा
0
5
2
4
6
0



